*गो.ए.सोसायटीच्या एच.पी.टी आर्ट्स व आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व विद्यार्थिनी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान उत्साहात संपन्न*
एच.पी.टी. आर्ट्स व आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आणि विद्यार्थिनी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाच्या प्रथम सत्राच्या वक्त्या एन.बी.टी.लाॅ महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. हेमा बुरुंग होत्या त्यांनी भारतीय संविधानातील महिलांच्या संबंधित कायदेशीर मुद्दे आणि पैलू या विषयावर विद्यार्थिनींना संबोधित केले स्त्रीत्व निसर्गतः लाभलेले वरदान असून स्त्रियांनी आपल्या क्षमता ओळखून सक्षम बनने गरजेचे आहे. असे मत त्यांनी याप्रसंगी मांडले स्त्री पुरुष समानता येण्यासाठी स्त्री स्वतः सजग राहून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून स्त्री विषयक कायद्यांची माहिती त्यांनी दिली दुसऱ्या सत्राचे वक्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश नाईक यांनी स्त्री सुरक्षा आणि कायदे याबद्दल माहिती दिली तसेच सायबर क्राईम, डिजिटल अरेस्ट बद्दल विविध केसेसचे उदाहरणे देत महत्त्वपूर्ण माहिती दिली तिसऱ्या सत्राच्या वक्त्या प्रा. प्रतिमा वाघ यांनी तणाव व्यवस्थापन या विषयावर आधारित प्रात्यक्षिक घेवून तसेच डॉक्युमेंटरी दाखवून त्या संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थिनीनी एकपात्री नाटक सादर केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख डॉ. विजयकुमार वावळे यांनी विद्यार्थिनी मंच आणि निर्भय कन्या अभियान याचा उद्देश सविस्तरपणे सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. के. अवस्थी यांनी निर्भयतेचा अर्थ समजावून सांगत स्त्रियांना निर्भय बनण्याची आवश्यकता का आहे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील कला शाखेचे उप प्राचार्य डॉक्टर प्रशांत देशपांडे, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. ए.जी. घनबहादुर आय.क्यु.एसी. समन्वयक व उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यार्थिनी मंच समन्वयक डॉ.नाजनीन देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. मालती सानप यांनी केले आभार प्रदर्शन डॉ. मेघा मांगुरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थिनी मंच समितीतील डॉ. ज्योती पठारे ,डॉ. मेधा मांगुरकर, डॉ. सुनिथा मेनन, डॉ. मालती सानप, प्रा. रूपाली चव्हाण , प्रा. श्रद्धा कुलकर्णी, प्रा. सोमय्या जानोरकर ,प्रा. कविता कटारे आदींनी परिश्रम घेतले. शिक्षकेतर कर्मचारी युवराज राजपूत अमर फुलावळे श्रीकांत पिंगळे यांचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले
