शिरपूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास : नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न*

 


शिरपूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास : नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न*


*शिरपूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चंदन आबा फाऊंडेशन, गंगाई चिल्ड्रेन हॉस्पिटल, नेताजी परिवार व युथ फ्रेंड सर्कल, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले.*

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असून त्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळी-संध्याकाळी रस्त्यावर ये-जा करणारे नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका, अपघात तसेच मानसिक तणाव निर्माण होत आहे.

*हा प्रश्न केवळ त्रासाचा नसून सार्वजनिक आरोग्य व नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नगरपालिकेने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी निर्णय घ्यावेत व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने