घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरटे हत्यारासह दोंडाईचा पोलीसांनी केली जेरबंद**

 


*घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरटे हत्यारासह दोंडाईचा पोलीसांनी केली जेरबंद**


दोडाईचा अख्तर शाह 

दोंडाईचा पोलीस ठाणे हद्दीत पोसई/नकुल कुमावत, पोलीस अमृत पाटील, प्रशांत गोराडे, प्रविण निकुंभे असे दोंडाईचा शहरात रात्री पेट्रोलिंग करीत असतांना दोंडाईचा धावडे रस्त्यावर रामी फाट्याजवळ मालपुर कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयित मोटार कार उभी दिसली. मोटारकार जवळ गेले असता पोलीस गाडी आल्याचे पाहुन त्यातुन दोन इसम खाली उतरुन पळून जात असतांना त्यास पोलीसांनी पकडून विचारपुस करता त्याने त्याचे १) संभुजी बकाजी ठाकुर, रा. छाबलीया वडनेर ता. वडनेर जि. महेसाना राज्य गुजरात २) दिलीपजी शंकरजी ठाकुर रा. सबळपुर ता. वडनेर जि, म्हसाना राज्य-गुजरात असे सांगितले त्यास त्याचे ताब्यात असलेल्या मोटार कारबाबत विचारपुस करता त्याने उडवाउडवी ची उत्तरे दिल्याने त्याच्यावर संशय आल्याने त्याची मोटार कारची व त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या मोटार कारमध्ये असलेल्या काळ्या रंगाच्या बंगमध्ये लोखंडी टामी, लोखंडी पाईप,

दोंडाईचा पोलीस ठाणे

अडजेस्टेबल पाना, लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर, गुलेर इत्यादी घरफोडी करण्यासाठी लागणारे हत्यार मिळुन आले. त्यांचेकडेस मिळुन आलेले सर्व मुद्देमाल व मोटार वाहन क्र.GJ-२७-CF-५०७४ हे जप्त करण्यात आले आहे. सदर संशयित आरोपीतांकडे अधिकचा तपास करता यातील आरोपी नामे दिलीपजी शंकरजी ठाकुर रा. सबळपुर ता. वडनेर जि. म्हैसाना राज्य गुजरात याचे विरुध्य गुजरात राज्यात वडगाव पोलीस स्टेशन जि. बनासकंठा, वडनगर पोलीस स्टेशन जि. महेसाणा, विसनगर तालुका पोलीस स्टेशन जि. महेसाणा, चाणस्मा पोलीस स्टेशन जि.

पाटण, उनावा पोलीस स्टेशन जि, मेहसाणा, जादर पोलीस स्टेशन जि, सबरकंठा, सिध्दापुर पोलीस स्टेशन जि. पाटण, गोधरा पोलीस स्टेशन जि. पंचम हाल असे वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडीचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. आरोपी नामे संभुजी बकाजी ठाकुर, रा. छाबलीया वडनेर ता. वडनेर जि. म्हैसाना राज्य गुजरात याचे विरुध्द वडगाव पोलीस स्टेशन जि. बनासकंठा येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. सदरचे दोन्ही आरोपी हे घरफोडी करण्याच्या उद्देशाने हत्यारानिशी मिळून आल्याने त्याचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ (अ) प्रमाणे गुन्हा

दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार पंकज ठाकुर करीत आहेत. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक नकुल कुमावत, इमरान खान, पोलीस अंमलदार अविनाश पाटील, सुनिल महाजन, अमृत पाटील, योगेश महाजन, प्रशांत गोराडे, प्रविण निकुंभे, निलेश हालोरे, हर्षव बागुल अशांनी केली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने