🚨 थाळनेर पोलिसांची मोठी कारवाई
10.380 किलो गांजा जप्त; 4.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे आरोपी अटकेत
धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत (Anti-Drug Operation) मोठे यश मिळवले असून गांजा वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करून तब्बल ४ लाख ८२ हजार ०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११.०० ते २० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ४.०० वाजेपर्यंत मा. पोलीस अधीक्षक, धुळे यांच्या आदेशान्वये शिरपूर–चोपडा रोडवरील भाटपुरा चौकी येथे नाकाबंदी (Police Naka Bandobast) लावण्यात आली होती.
🚓 Swift Car Intercepted During Night Checking
नाकाबंदी दरम्यान चोपड्याकडून शिरपूरकडे येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या Swift कार (GJ-06 PL-6252) वर संशय आल्याने पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली. वाहनामध्ये दोन इसम आढळून आले. प्राथमिक चौकशीत गांजा असल्याचा संशय बळावल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन छापा कारवाई (Raid Operation) करण्यात आली.
📦 10.380 KG Ganja Seized | NDPS Act
वाहनाच्या पाहणीत एका गोणीत प्लास्टिक आवरणात 10.380 किलो वजनाचा गांजा आढळून आला. सदर गांजाची किंमत ₹82,080/- असून Swift कारची किंमत ₹5,00,000/- आहे. असा एकूण ₹4,82,080/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
👤 Accused Arrested
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
कुणाल सुभाष नाईक, वय 22 वर्षे, रा. दौलतनगर, ता. शिरपूर, जि. धुळे
आकाश मुकुंद पानपाटील, वय 28 वर्षे, रा. मोगलाई, रमापती चौक, ता. जि. धुळे
दोन्ही आरोपींविरोधात थाळनेर पोलीस स्टेशन येथे NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
🔍 Investigation Underway
या प्रकरणाचा पुढील तपास पोसई समाधान भाटेवाल करत आहेत. गांजा कुठून आणला व कुठे नेला जात होता, याबाबत Drug Supply Network चा तपास सुरू आहे.
👮♂️ Police Team Behind the Success
ही कारवाई मा. श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, धुळे), मा. अजय देवरे (अपर पोलीस अधीक्षक), मा. सुनिल गोसावी (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, पोसई समाधान भाटेवाल, हर्षल पाटील, तसेच पोलीस कर्मचारी कीरण सोनवणे, धनराज मालचे, मुकेश पावरा, उमाकांत वाघ, राम बारसे, आकाश साळुंखे यांचा सहभाग होता.
