**शारदीय पौर्णिमेनिमित्त सौरभ फिटनेस व नटराज डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरतीचे आयोजन**
दोडाईचा अख्तर शाह
दोडाईचा सौरव मंगलकार्यलय येथे
**शारदीय पौर्णिमेनिमित्त सौरभ फिटनेस व नटराज डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले
या आरतीत एकूण १११ महिलांनी सहभाग घेत आरतीचा लाभ घेतला.
यानिमित्ताने आयोजित क्लब गरबा कॉम्पिटिशनमध्ये सहभागी स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत
प्रथम क्रमांक एंजल कुकरेजा
द्वितीय क्रमांक अंकिता माखिजा तृतीय क्रमांक – गुणगुण वालेचा
यांनी पटकावला तसेच १५ पेक्षा अधिक विजेत्यांना गिफ्ट हॅम्पर्स देण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले तांडव बिट्स” या लाईव्ह संगित ऑर्केस्ट्राचे सादरीकरण.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ.पूजाताई खडसे यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. स्नेहा अयाचीत, सारिका अग्रवाल, चंद्रकला सिसोदिया, वैशाली महाजन, मनिषा गिरासे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री. विकास बाटुंगे यांनी केले होते
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. निशाताई बाटुंगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
