शिरपूर तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करावा, पीकविमा मिळावा, कर्जमाफी मिळावी शिरपूर फर्स्ट संघटने चे निवेदन
दिवाळी नंतर शेतकरी एल्गार मोर्चा चा प्रशासनाला इशारा.
शिरपूर तालुक्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीत झालेल्या नुकसानीमुळे तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागण्यांचे निवेदन शिरपूर फर्स्ट संघटने च्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यात पावसामुळे पिके पूर्णतः नष्ट झालेली आहे. आज तालुक्यात सर्वच पिकांची दयनीय अवस्था आहे.यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यात घडली आहे.
शेतकऱ्यांच्या या अवस्थेमुळे शासनाने तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त भागात समावेश करावा.तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी. जेणेकरून त्या कुटुंबाला मदत होईल. एवढेच नव्हे तर पीकविमा चा ही शेतकऱ्याला काही उपयोगाचा नाही. यातही शेतकऱ्यांना अडचण येत आहे.त्यामुळे पीकविमा त्वरित मिळावा. अशी मागणी करण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या शिरपूर फर्स्ट च्या प्रतिनिधींनी मांडल्या. निवेदनात राज्य सरकारने केलेल्या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफी त्वरीत अंमलात आणावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील विविध भागातील शेतकरी उपस्थित होते.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास, शेतकरी कर्जमाफी दिवाळी पर्यंत न झाल्यास दिवाळी नंतर शिरपूर तालुक्यातील शेतकरी आंदोलन करतील. दिवाळी नंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांचा विराट एल्गार मोर्चा काढण्यात येईल, त्यासाठी आजच गावोगावी शेतकऱ्यांना भेट देण्यात येईल. असे शिरपूर फर्स्ट समन्वयक हंसराज चौधरी यांनी सांगितले आहे.
शिरपूर फर्स्ट च्या वतीने शिरपूर फर्स्ट या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप मधील सदस्यांनी शिरपूर तालुक्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे ठरवले होते. या अंतर्गत व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून २१ हजार रुपये जमा करण्यात आले. जमा केलेले २१ हजार रुपये प्रत्येकी १० हजार ५०० प्रमाणे भाटपुरा येथील कै.जगदीश बंजारा व कुरखळी येथील कै.युवराज कोळी या दोन्ही कुटुंबांना सुपूर्द करण्यात आले.
ShirpurFirst #FarmersRelief #FloodAffectedArea #HeavyRainDamage #ShirpurNews #SupportFarmers #MaharashtraFloods #CropLoss #FarmerCrisis #DeclareDisasterZone
