शिरपूर तालुका सीड्स, पेस्टिसाइडस् व फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी उपाध्यक्षपदी गौरव अग्रवाल यांची निवड
थाळनेर (प्रतिनिधी)
शिरपूर तालुका सीड्स, पेस्टिसाइडस् व फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशनच्या बैठक माफदाचे राजेंद्र भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी हेमंत चौधरी, उपाध्यक्षपदी गौरव अग्रवाल,सचिव भूपेश अग्रवाल,खजिनदार निलेश अग्रवाल यांची फेरनिवड करण्यात आली. कार्यकारणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली संचालक पदी राजेश पगारे,ज्ञानेश्वर बडगुजर, नामदेव धनगर,जितेंद्र पाटील,प्रकाश वाणी, नगराज पाटील,ललित राजपूत,पि.टी पाटील, जितेंद्र जैन,शिवाजी गोपाल,मनोहर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी अध्यक्ष हेमंत चौधरी यांनी मागील दोन वर्षाचा जमाखर्चाचा हिशोब देऊन दोन वर्षात केलेल्या विविध कामांची व उपक्रमाची माहिती दिली.यावेळी कृषी विक्रेत्यांनी त्यांना येणाऱ्या विविध अडचणी मांडल्यात त्यावर देखील चर्चा करण्यात आली.
