रोटरी स्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन* दोडाईचा मुस्तफा शाह

 


*रोटरी स्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन*

दोडाईचा मुस्तफा  शाह 

 दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय धुळे व ग्रामसंजीवनी प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पथक प्रमुख श्री. राहुल अहिरे आणि सहाय्यक पथक प्रमुख श्री. सचिन घोडे यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा कवायत यांची प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक, समन्वयक श्री प्रशांत जाधव उपस्थित होते.

      श्री. राहुल अहिरे यांनी आग प्रतिबंधकाचा वापर, विविध प्रकारच्या दोराच्या गाठी, आपत्तीग्रस्तांचे बचाव कार्य, आपत्तीच्या प्रसंगी आग, विषबाधा, सर्पदंश, भूकंप, चेंगराचेंगरी, पूर या विविध प्रसंगी बचाव कार्य व सुरक्षित स्थळी माणसांना नेण्याबाबतची प्रात्यक्षिके, प्रथमोपचार, विविध अवयवांच्या अपघातप्रसंगी बँडेज बांधणे, मूर्छित अवस्थेत अवयवांचे सी. पी. आर. याबाबत माहिती दिली.

     ते म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी चेंगरीचेंगरी न करता शिस्तीने व रांगेत बाहेर जावे. पूरस्थिती निर्माण झाल्यास  लाईफजॅकेट, थर्माकॉल डिव्हाईस, दोरीला बांधलेले हवाबंद प्लास्टिक ड्रम यांचा वापर करावा. घरात गॅस गळती होत असल्यास कोणत्याही इलेक्ट्रिक साधनाचा वापर करू नये, घराची दारे खिडक्या उघड्या कराव्यात. शाळेतील अग्निशमन यंत्र, चढउताराची जागा व परिसराची माहिती माहिती करून घ्यावी. शाळेत खेळताना किंवा इतरवेळी  रक्तस्राव होत असल्यास उपचाराआधी बँडेज किंवा किंवा मलमपट्टी करावी. आपत्तीसंबंधी असणारी प्राथमिक माहिती समजून घेऊन आपत्तीप्रसंगी आपला जीव वाचवण्याचा  प्रयत्न करावा. आपत्तीसमयी  रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या आपत्ती प्रतिसाद दलाला  सहकार्य करावे. दोन्ही प्रशिक्षकांनी आपत्तीच्या प्रसंगी प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त व जीवाचे रक्षण करणारी प्रात्यक्षिके विद्यार्थी विद्यार्थिनींकडून करवून घेतली.सूत्रसंचालन अंजना राजपूत यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने