एसपीडीएम महाविद्यालयात देशभक्तीपर कार्यक्रमाची रंगत-"जीवन गाणे गातच जावे" -राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम.

 


एसपीडीएम महाविद्यालयात देशभक्तीपर कार्यक्रमाची रंगत-"जीवन गाणे गातच जावे" -राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम.


शिरपूर (७)येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एस .पी डी. एम. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व डॉ. पा.रा. घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत व संस्थेचे विश्वस्त रोहित रंधे यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रमासह सांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आला.

      ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम गीतांबरोबरच महापुरुषांच्या संदर्भातील गीते तसेच अनेक लोकप्रिय गाण्यांचे गायन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माहिती पुस्तिकेत दिलेल्या विविध गीतांचे चालद्धरीतीने गायन करण्यात आले.

      शाळा, महाविद्यालयाचे दिवस म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हक्काचा मंच. एस. पी.डी.एम महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नेहमीच विविधरंगी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने नुकताच "जीवन गाणे गातच जावे" हा सांस्कृतिक उपक्रम महाविद्यालयाच्या डिजिटल हॉलमध्ये पार पडला.

    यावेळी रोहित थोरात, आदित्य कोळी, प्रेरणा गवडे, गायत्री पाटील, निलाक्षी निकम या स्वयंसेवक कलाकारांनी कार्यक्रमात भाग घेऊन देशभक्ती ,सामाजिक एकोपा आणि राष्ट्रभक्तीवर आधारित गायन स्पर्धेत भाग घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. अनेक स्वयंसेवकांपैकी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रॅम पासून ते पोवाडा पर्यंत आणि कविता वाचनातून नृत्यांपर्यंतच्या कार्यक्रमात भाग घेऊन आपल्या नियमित रोजच्या लेक्चर, नोट्स, अभ्यासातून काही निवांत क्षण घालवले. यावेळी प्रथमच नियमित कार्यक्रमांतर्गत अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा आनंद झाल्याचे स्वयंसेवकांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

      राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.डी एल पावरा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रकांत सोनार यांनी प्रास्ताविक केले तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. वाय. तायडे यांनी मांनले.

     कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागाचे धुळे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. व्ही. एल. चव्हाण, माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण पवार, प्रा. रत्नपारखे , कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत सोनार, प्रा. डॉ.एस .पी .महिरे, प्रा.वासुदेव मेश्राम तसेच ताराचंद बोरसे, गणेश तिरमले, मनोहर पाटील ,समीर पाटील ,भूषण पाटील, शशिकांत ओगले उपप्राचार्य डॉ.डी.डी.भक्कड डॉ.,ए. एम .देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वि. ए. चव्हाण यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विद्यार्थी स्वयंसेवक व कर्मचारी  बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने