शिरपूर तालुक्यात ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम राबणार – नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज"

 


"शिरपूर तालुक्यात ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम राबणार – नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज"



शिरपूर (प्रतिनिधी) :


छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील अभियानांतर्गत राज्य शासनाच्या आदेशानुसार १५ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ विविध उपक्रमांसह शिरपूर तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश जनतेपर्यंत शासनाच्या योजना, सुविधा पोहोचवणे तसेच सामाजिक उपक्रमांना चालना देणे हा आहे.


महसूल व वनविभाग मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत.


उपक्रमांचा तपशील


1. पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर २०२५)


शिवपानंद रस्त्यांची सर्वेक्षण करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र देणे, रस्ता अदरक आयोजित करून प्रलंबित शेत रस्त्यांची प्रकरणे निकाली काढणे, शेत रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे,


या मोहिमेच्या शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता राजगोपाल भंडारी हॉल शिरपूर, आर सी पटेल मेन बिल्डिंग येथे आयोजित केला आहे.



2. दुसरा टप्पा (२३ ते २७ सप्टेंबर २०२५)



सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत शासनाचे वाटपास उपलब्ध असलेली जमीन घरकुलांसाठी कब्जे हक्काने प्रदान करणे, विधानसभेचे नियमातील तरतुदीनुसार अतिक्रमणे नियमित करून नियमाकुल करणे.


3. तिसरा टप्पा (३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५)



तालुक्यातील आदिवासी बहुल दुरगम भांग मौजे काकडमाळ,हेॅन्द्रापाडा, सामारादेवी.गधडदेव. महादेव दोंदवाडा, आबे,मालकातर,फत्तेपूर (फॉ. जळोद. मुखेड ये तहसीलदार यांची भेट व नागरी संवाद. 

विविध शासकीय योजनांच्या अडचणी व प्रलंबित प्रकरणांचे निराकरण करणे, जनसंवाद व महसूल प्रशासनाच्या योजनांचा लाभ प्रदान करणे.


नागरिकांना आवाहन


या कालावधीत नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्यात, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे तहसीलदार शिरपूर यांनी आवाहन केले आहे.


शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम रंगणार असून, हा कार्यक्रम लोक-शासन संवादाचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने