शिरपूर येथे सेवा पंधरवाडा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम*
राष्ट्रनेता माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती2 ऑक्टोबर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत महसूल सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याचे नियोजन संपूर्ण शिरपूर तालुक्यात उपविभागीय अधिकारी शिरपूर व तहसीलदार शिरपूर यांच्या मार्गदर्शन व अधिपत्याखाली नियोजन सुरू आहे.
या पंधरवड्यात संपूर्ण शिरपूर तालुक्यात गाव नकाशावरील रस्ते व गाव नकाशा वरील नोंद नाही परंतु वापरात असलेल्या रस्त्यांची नोंद घेणे बाबत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना सूचना देणेत आले आहेत तसेच उपरोक्त सर्व पानंद रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण करणेबाबत शिरपूर तालुक्यात नियोजन करण्यात आले आहे
त्यानुसार शिरपूर तालुक्यातील मौजे खर्दे बु.-उंटावद या रस्ता वर दुतर्फा वृक्षारोपण तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी सरपंच लताजी बागुल मंडळ अधिकारी शिरपूर ग्राम महसूल अधिकारी खर्दे. बु व ग्रामसेवक खर्दे बुद्रुक तसेच खर्दे बु. येथील ग्रामस्थ उपस्थित होते
