स्व.चंदनसिंह राजपूत यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन*



 *स्व.चंदनसिंह राजपूत यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन*


शिरपूर : स्व.चंदनसिंह राजपूत यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर शहरात चंदन आबा फाउंडेशन, नेताजी परिवार युथ फ्रेंड सर्कल आणि गंगाई चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील अनेक गरजू लोकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

शिबिराची सुरुवात स्व. चंदनसिंह राजपूत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. 


यावेळी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. या शिबिरासाठी आरोग्य सेवा देण्यासाठी आलेल्या डॉक्टरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणात स्व. चंदनसिंह राजपूत यांच्या सामाजिक कार्याची आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून दिली. त्यांनी आयुष्यभर केलेल्या गोरगरिबांच्या सेवेला, मित्र परिवाराप्रती असलेल्या आपुलकीला आणि सामाजिक जीवनातील त्यांच्या योगदानाला उजाळा दिला.


या आरोग्य शिबिरात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. यामध्ये डॉ.जितेंद्र ठाकूर,डॉ.प्रांजल पाटील,डॉ.प्रफुल जाधव, डॉ. राहुल भामरे,डॉ.श्रीकांत बामणे,डॉ.राहुल पाटील आणि डॉ. चिन्मय साळुंखे यांचा समावेश होता. या सर्व डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले.


याप्रसंगी मोठ्या संख्येने आरोग्य सेवेचा लाभ घेणारे लाभार्थी, मित्र परिवार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी केले तर डॉ. दीपक गिरासे यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदन आबा फाउंडेशन, नेताजी परिवार युथ फ्रेंड सर्कल, गंगाई चिल्ड्रन्स हॉस्पिटल व मित्र परिवाराने मोलाचे सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने