*रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम*
दोडाईचा मुस्तफा शाह
दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल व श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती रोटरी प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये साजरा करण्यात आलेल्या 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण रोटरी क्लब ऑफ दोंडाईचाचे अध्यक्ष श्री हरीश जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या राष्ट्रीय सणाला संस्थाध्यक्ष श्री. हिमांशु शाह, संचालक डॉ. राजेश टोणगांवकर, श्री पी.सी. शिंदे, सौ. हेतल शाह, प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक, इंचार्ज बतुल बोहरी, रो. सतिश पाटील, डॉ. चेतन बच्छाव, सौ. भारती बच्छाव, डॉ. पूर्वा टोणगांवकर , डॉ. नितीन बिराडे, रो. अनिश शाह, डॉ. निर्मलकुमार पवार,रो. भारत गिरासे, रो.अमित चित्ते, समन्वयक श्री प्रशांत जाधव व पालकवर्ग उपस्थित होते.
रियांश गिरासे, विनिशा बाटुंगे, गौरव धनगर, तृप्ती पाटील, आयुषमान बच्छाव, सिद्धेश देसले यांनी आपल्या भाषणातून देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन भारतभूमीला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त केल्यामुळे 15 ऑगस्ट भारत देशासाठी अभिमानाचा, सौभाग्याचा सन्मानाचा दिवस असून तो आम्हाला संघर्षाची व प्रेरणादायी प्रवासाची आठवण करून देतो. देशभक्तांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या स्वप्नातील सुशिक्षित, सुसंस्कारीत, प्रगत व उद्योगप्रधान भारत निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांनी स्वीकारली पाहिजे. असे मत मांडले.
विद्यार्थ्यांनी मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, फिर भी दिल है हिंदुस्थानी या देशभक्तीपर गीतांवर नृत्य, थोरवीरांचा भूमिका व त्यांची वचने, देशभक्तीपर गीतांचे गायन, मल्लखांबचे प्रात्यक्षिके, पहलगाम येथील भ्याड हल्लाचा बदला घेणारे मिशन ऑपरेशन शिंदूर या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
ध्वजारोहणाचे प्रमुख पाहुणे
श्री हरीश जैन म्हणाले की, उत्तम नागरिक या नात्याने राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करून देशात एकता, समता, बंधुभाव राखला पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ वीर जवान, प्रगतीशील शेतकरी बनण्याचा संकल्प पूर्ण करून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करावे.
सूत्रसंचालन सुवर्णा जाधव, सायली पाटील,कुमुदिनी पाटील यांनी केले
