शिरपूर परम गुरुकुल येथे उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा स्वातंत्र्य दिन साजरा
शिरपूर प्रतिनिधी - दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी परम गुरुकुल शाळेमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहणाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय निसर्ग प्रेमी श्री. शिवाजी दादा राजपूत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ. दीपिका पृथ्वीराज रावल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून राष्ट्रगीतानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, नृत्य आणि भाषणाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाषसिंह शांतीलाल जमादार सचिव श्री. कल्पेशसिंग सुभाषसिंग राजपूत हे उपस्थित होते,
मुख्याध्यापक हरीकृष्ण निगम यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांचे स्मरण करून विद्यार्थ्यांना देशसेवेचे महत्त्व पटवून दिले. यानंतर विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण शाळा देशभक्तीच्या वातावरणाने भारलेली होती.
