*प्रताप रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, दोंडाईचा येथे ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.*
दोडाईचा अख्तर शाह
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने *प्रमुख अतिथी* मा. डॉ श्री हेमंत नागरे (साई बाल रुग्णालय दोंडाईचा) यांच्या शुभ हस्ते प्रथम भारत मातेच्या प्रतिमेची पूजा आणि माल्यार्पन करून ध्वजारोहण करण्यात आले, *कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे* श्रीमती लताताई कोठावदे (जॉयंट्स सहेली ग्रुप अध्यक्ष) मीनाक्षी जाधव मॅडम, (जायन्ट्स सहेली ग्रुप सचिव, दोंडाईचा) ऍड स्नेहा आयचित, श्रीमती पिंकी माहेश्वरी, श्री योगेश माहेश्वरी, श्री सुनील धनगर, श्री पंकज गिरासे (जाॅयंट्स क्लब अध्यक्ष) श्री भीमलिंग लिंबारे (जाॅयंट्स क्लब सदस्य) श्री कोमलसिंग गिरासे व *शाळेचे आधारस्तंभ* श्री चंद्रशेखर सिसोदिया साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली होती. यावेळी राष्ट्रगीत, झेंडा गीत, देशभक्ती गीत, व पेट्रोटिक गीतावर विद्यार्थ्यांनी रंगीत कवायत सादर केली. विद्यार्थ्यांनी देशभक्ती पेट्रोटिक सॉन्ग वरती डान्स देखील सादर केले. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली यात हर्षल जया सचिन सोनवणे (इ.७ वी), मेहुल पूजा अमोल बागल (इ. ५ वी), मितेश शितल ललितसिंग जमादार (इ. ४ थी), पियुष सुवर्णा हरपालसिंग राजपूत (इ. ४ थी), समर्थ पुनम लक्ष्मण शिंदे (इ. ४ थी), सार्थक रोशनी रणवीर कापुरे (इ. ३ री), मोहित शोभना दादाभाई वाघ (इ. ३ री), भाग्येश प्रियंका सुदाम धनगर सिनियर केजी व शेवटी *ऑपरेशन मिशन सिंदूर* ड्रामा इ. ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. मा. डॉ. हेमंत नागरे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी, मोबाईलचे होणारे दुष्परिणाम विषयी व शिक्षण हे देशासाठी, समाजासाठी, स्वतःचा विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच *एसओएफ ऑलिंपियाड* परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कुंजल सुनील भोई इ. ५ वी, तनिष्का गोपाल सिंग गिरासे इ. ५ वी, काव्या प्रदीप गिरासे, महंत रोहित राजपूत या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट वाटप करण्यात आले व शाळेचे प्रिन्सिपल मा. श्री ललित संतोष कुवर यांना एसओएफ ओलंपियाड तर्फे बेस्ट प्रिन्सिपल अवार्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपस्थित *शाळेच्या चेअरमन* सौ. चंद्रकला सिसोदिया मॅडम व *अँडमिनिस्ट्रेशन* श्री अमोल बागल सर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. तसेच शाळेत *सुंदर असे फलक लेखन* लक्ष्मण गवळे सर *फोटोग्राफी* भावना राजपूत मॅडम व प्रिया रावल मॅडम यांनी केले. त्याचबरोबर शाळेतील शिक्षक जितेंद्र निकम सर, दीपक पारधी सर, शितल जगताप मॅडम, निमा पावरा मॅडम, रिंकू गिरासे मॅडम, शिल्पा गिरासे मॅडम, किरण राजपूत मॅडम, किरण जाधव मॅडम, भाग्यश्री सोनार मॅडम, दिव्या राजपूत मॅडम, जया सोनवणे मॅडम, योगिता तमाईचेकर मॅडम व *शिक्षकेतर कर्मचारी* अधिकार गवळे, पूजा निकम, नेहा कोळी यांच्या मेहनतीचे शाळेच्या चेअरमन सौ चंद्रकला सिसोदिया मॅडम यांनी कौतुक केले.
सुत्रसंचालन श्री अमोल बागल सर व विनोद गीते यांनी केले.
