**आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर अवैध विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या इसमांवर दोंडाईचा पोलीसांची धडक कारवाई**
दोडाईचा (मुस्तफा शाह)
मा. पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांनी आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने अवैध दारु विक्री वाहतुक करणा-यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
दिनांक-२८/०८/२०२५ पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, दोंडाईचा पोलीस ठाणे, धुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की, दोंडाईचा शहरातुन नंदुरबारकडे एक पांढऱ्या रंगाची काळी काच असलेली कारमधुन अवैधरित्या विनापरवाना विदेशी दारुची वाहतुक होणार आहे. सदर बातमीच्या अनुषगाने दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन नंदुरबार चौफुली येथे अचानक नाकबंदी करुन येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी सुरु केली त्यावेळी दोंडाईचा बस स्थानकाकडुन येणारी चार चाकी क्र. MH-३९-j-२८६९ हिस थांबवुन पथकामार्फत तपासणी केली असता गाडीत विदेशी दारु अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आली.
सदर वाहन चालक कुंदन बजरंगे वय-२४ वर्षे, रा. कजरवाडा ता.जि. नंदुरबार व सोबत शिवाजी धासु वळवी, वय-४२ वर्षे, रा. कोळदे, जि. नंदुरबार यांचे ताब्यातुन खालील विदेशी दारु व वाहन हस्तगत करण्यात आले.
किंमत मुद्देमालाचे वर्णन २,४२,८८०/-
रुपये किंमतीची मॅकडॉल नं.१ कंपनीची १८० मिली क्षमतेची काचेची बाटल्या अंतर्भूत असलेले खाकी रंगाचे खोके प्रत्येक खोक्यामध्ये ४८ नग बाटल्या एकुण २३ खोके एका नगाची छापिल किंमत-२२०/-प्रमाणे (एकूण नग-४८४२३= ११०५ नग) १२,४८०/-रुपये किंमतीची रॉयल चॅलेंज कंपनीची १८० मिली क्षमतेची प्लास्टिकची लाल रंगाच्या बाटल्या अंतर्भूत असलेले खाकी रंगाचे एक खोके ज्यामध्ये एकुण ४८ नग बाटल्या. एका नगाची छापिल किंमत-२६०/- प्रमाण ४,००,०००/- रुपये किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट VDI मॉडल असलेली जिच्या दोन्ही बाजुस रजिस्ट्रेशन नंबर महाराष्ट्र ३९ जे २८६९ अशी नंबर प्लेट असलेली पांढऱ्या रंगाची कार जु.वा.किं.अं.एकुण रुपये ६,५५,३६०/- किंमतीचा मुद्देमाल वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करुन दोन्ही इसमांवर दोडाईचा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकों / रमेश वाघ करित आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, सपोनि- दिगंबर शिंपी, पोउपनि अविनाश दहिफळे, नकुल कुमावत, पोलीस अंमलदार अविनाश पाटील, पंकज ठाकुर, रमेश वाघ, रविंद्र गिरासे, राजेंद्र येंडाईत, तुषार पवार, हिरालाल सुर्यवंशी, प्रविण निकुंभे, अक्षय शिंदे, सौरभ बागुल, होमगार्ड गणेश शिरसाठ, विनोद कोळी, संदिप ठाकुर, अमिन शहा, प्रविण बैसाणे यांनी केली.
