**दोंडाईचा मध्ये शाडू मातीच्या गणपतीची कार्यशाळा संपन्न, लायन्स शताब्दी आणि लिओ क्लब चा अनोखा उपक्रम**
दोडाईचा मुस्तफा शाह
लायन्स क्लब शताब्दी दोंडाईचा, लिओ उमंग आणि लिओ लिगसी यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईचा मध्ये शाडूच्या मातीचा गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत प्रशिक्षक कुणाल वीर यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी मंडाले हॉस्पिटलचे डॉक्टर अनिकेत पाटील हे देखील उपस्थित होते, त्यांनी देखील स्वतः गणपती बनवून विद्यार्थ्यांना प्रोत्सहीत केले.
संपूर्ण कार्यशाळेमध्ये 125 मुलांचा सहभाग होता
सर्व शाळांमधून आलेल्या मुलांनी उत्कृष्ट प्रकारचे गणपती बनवले. याप्रसंगी लायन्स क्लब शताब्दी च्या अध्यक्षा सौ अनिता मंडाले, सचिव कविता पाटील, शितल भावसार, निर्मला ओगले, सुगंधा जैन, शितल जैन हे उपस्थित होते.
तसेच लिओ उमंग क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश भागवत, श्रेयांश कुचेरिया, कृष्णा शर्मा, भूषण राजपूत, उत्कर्ष बम
लिओ लिगसी क्लबचे अध्यक्ष साक्षी रुणवाल, दर्शना साठे, आस्था जैन, निकिता जैन, वैष्णवी सराफ हे उपस्थित होते. पुनम भावसार, स्वाती जगताप, प्राची सोनवणे आणि गणेश काळे यांनी विशेष मेहनत घेतली.
