ठाणे येथील राजपूत समाज सेवा संघाच्यावतीने मा.विधान परिषदेचे आमदार श्री.रविंद्र फाटक यांचा वाढदिवस निमित्त सत्कार
ठाणे येथील राजपूत समाज सेवा संघाच्यावतीने मा.विधान परिषदेचे आमदार श्री.रविंद्र फाटक यांचा वाढदिवसानिमित्त पंचरत्नद्वार खारीगाव,ठाणे येथील राजपूत समाजाच्या नवनिर्मित कार्यालयात शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन संघाचे अध्यक्ष श्री.आर.के. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी या प्रभागातील माजी नगरसेवक श्री.उमेशनाना पाटील,माजी नगरसेविका सौ.रचनाताई पाटील,राजपूत महिला संघाच्या अध्यक्षा सौ.आशा राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी राजपूत सेवा संघाच्यावतीने मा.आमदार श्री.रविंद्र फाटक यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
दरम्यान अध्यक्ष आर. के.पाटील यांनी आपल्या प्रस्ताविकात राजपूत समाज सेवा संघाची रुपरेषा विषद करून मा.नगरसेवक श्री.उमेशनाना पाटील यांचे समाजाला कार्यालयासाठी जागा दिल्याबद्दल मनस्वी आभार मानले.याप्रसंगी राजपूत समाजातील
गुणीजनांचा रविंद्र फाटकसाहेब,उमेशजी पाटील,सौ.रचनाताई पाटील यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना फाटकसाहेब म्हणाले की,राजपूत समाजाला ज्या ज्या वेळी सहकार्याची गरज भासेल,त्या त्या वेळी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.तसेच वाढदिवसानिमित्त माझा सत्कार केला,याबद्दल मी राजपूत समाज सेवा संघाचा ऋणी आहे,या शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी *प्रयास-वधू वर कक्ष* आणि *उद्यमी-महिला बचत गट कक्ष* चे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.तसेच उमेशनाना पाटील यांनी आपल्या भाषणात राजपूत समाजाला यापुढेही सढळ हातांनी मदत करण्याचे अभिवचन दिले.
या कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष आर. के.पाटील, सचिव नरेंद्रसिंग पाटील,खजिनदार राजेंद्र पाटील,अन्य कार्यकारणी सदस्य अन् ठाणे जिल्ह्यातील राजपूत समाजाचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
