🚆 दोंडाईचात पुणे गाडी साठी रेल रोको आंदोलन १० सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंतिम मुदत; रेल्वे अधिकारी दीपक मटई यांचे आश्वासन दोंडाईचा प्रतिनिधी : मुस्तफा शाह

 



🚆 दोंडाईचात पुणे गाडी साठी रेल रोको आंदोलन


१० सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंतिम मुदत; रेल्वे अधिकारी दीपक मटई यांचे आश्वासन


दोंडाईचा प्रतिनिधी : मुस्तफा शाह


ताप्ती सेक्शनवरून पुणे रेल्वे गाडी सुरू करावी या मागणीसाठी प्रवासी संघटनांनी स्वातंत्र्य दिनी दोंडाईचा रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन छेडले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने संतप्त प्रवाशांनी आज रुळावर उतरून तीव्र आंदोलन केले.


लोकनेते सरकार साहेब रावल व पश्चिम रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रवीण महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी संघटना, शहरातील विविध सामाजिक संस्था व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. आंदोलकांनी स्पष्ट केले की आता चर्चेत वेळ न घालवता पुणे गाडी सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा.


रेल्वे प्रशासनाने सुरत येथील ए.आर.ओ. दीपक मटई यांना चर्चेसाठी पाठवले. परंतु ठोस भूमिका न घेता ते कार्यालयात परत गेल्याने आंदोलक संतप्त झाले व रुळावर उतरले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर रेल्वे अधिकारी यांनी डीआरएम मुंबई यांच्याशी संभाषण करून येत्या १० ते १५ दिवसांत सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन दिले. यावर लोकनेते सरकार साहेब रावल यांनी “१० सप्टेंबरपर्यंत मुदत, त्यानंतर ठोस निर्णय न झाल्यास मी स्वतः रेल रोको आंदोलनाचे नेतृत्व करेन” असा इशारा दिला.


या आंदोलनावेळी पोलिस निरीक्षक दिनेश सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक नकुल कुमावत यांच्यासह रेल्वे पोलिस दलाने शिस्त राखली.


मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी संघटना, रोटरी, लायन्स, जायंटस, पत्रकार व नागरिक सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शांततेत आंदोलनाची सांगता केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने