शिरपूरात पहाटे दुकानफोडीचा प्रयत्न फसला – पोलिसांच्या चतुराईने तिघे चोर जेरबंद

 



शिरपूरात पहाटे दुकानफोडीचा प्रयत्न फसला – पोलिसांच्या चतुराईने तिघे चोर जेरबंद


शिरपूर प्रतिनिधी - 

शिरपूर तालुक्यातील कालापाणी फाटा येथे पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका चोरीच्या प्रयत्नाला पोलिसांनी अचूक हालचालींमुळे आळा घातला. दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 5 वाजता एका इसमाचे दुकान फोडत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला घटनास्थळी रवाना केले.

पथकाने घटनास्थळी पोहोचल्यावर चोरी करणाऱ्या इसमांनी एका व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला दुखापत केली आणि दुकानाचे शटर उचकवून गल्ल्यातील ₹3,300 रोख चोरून पळ काढला. घाईत त्यांनी आपले वाहन आणि काळ्या रंगाची सॅग बॅग घटनास्थळी सोडून दिली. जखमीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, पथकाने जंगलात शोध मोहीम राबवत तिघा संशयितांना पकडले. त्यांची नावे अशी आहेत:

1. सुपरासिंग दर्शनसिंग पटवा (वय 32), रा. ओझर, ता. राजपूर, जि. बडवाणी (म.प्र.)

2. जितेंद्रसिंग सागरसिंग बावरी (वय 30), रा. आकाश नगर, द्वारकापुरी, इंदौर (म.प्र.)

3. राजवीरसिंग उजागरसिंग पटवा (वय 20), रा. ओझर, ता. राजपूर, जि. बडवाणी (म.प्र.)

जप्त माल ₹3,300 रोख रक्कम (₹500, ₹200, ₹100, ₹50 च्या नोटा),2 मोबाईल फोन (किंमत ₹1,000),कैचीची 5 पाते, मास्क, स्क्रूड्रायव्हर, बॅटरी, कुलूप, दोरी, लोखंडी कटावणी,NICE कंपनीची काळी सॅग बॅग,2 होंडा शाईन मोटारसायकली (किंमत ₹60,000)

एकूण जप्त मालाची किंमत ₹64,300 एवढी आहे. तपासादरम्यान जप्त मोटारसायकली या थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेलेल्या असल्याचे उघड झाले.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक 225/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(6), 311 अंतर्गत दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत. आरोपींना 14 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार:

मा. श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, धुळे), श्री. अजय देवरे (अपर पोलीस अधीक्षक, धुळे), श्री. सुनिल गोसावी (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. जयपाल हिरे, पोसई मनोज कचरे, पोहेकॉ अनिल शिरसाठ, पोना मोहन पाटील, पोकॉ भुषण पाटील, पोकॉ गुरुदास बडगुजर, पोकॉ वाला पुरोहीत, चापोहेकॉ गिरधर पाटील, चापोकॉ मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने