*शिरपूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा दिव्यांग बांधवांसोबत उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा*
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ना.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिरपुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दिव्यांग बांधवांसोबत केक कापून आणि मिठाई देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्याच बरोबर राज्य सरकारचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त आदरणीय शिवाजीराव राजपूत यांच्या “वनश्री“ या ऑक्सीजन पार्क ला भेट देऊन तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. आशिषकुमार अहिरे तालुकाध्यक्ष कुबेर जमादार , विधानसभा क्षेत्रप्रमुख अभय करंकाळ, जिल्हासंघटक शंभू खैरनार, अल्पसंख्याक प्रदेश सचिव वाजीदभाई शेख, विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस भूपेश पाटील, कार्याध्यक्ष दुर्गेश पटेल, गौरव वाघ, आसिफ कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते..

