शिरपूर तालुक्यात आढळला अनोळखी मृतदेह — माहिती देणाऱ्यास ₹५०,००० चे बक्षीस!
शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दि. ४ एप्रिल २०२५ रोजी, महामार्ग क्र. ३ जवळील आमोदे गावाच्या शिवारातील शेतात हा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ वर्षे असून त्याच्या ओळखीबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही.
मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे: रंग सावळा, चेहरा गोल, शरीरयष्टी सडपातळ, डाव्या हाताच्या मनगटावर हृदयाच्या आकारासारखी नशा (टॅटू) गोंदलेली आहे. तसेच डोक्यावर व माठ्यावर इजा असून काही केस सोनेरी रंगवलेले आहेत.
पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कुणाकडे या मृत व्यक्तीबाबत काही माहिती असेल तर त्यांनी खालील पोलिस अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा:
सपोनि. शत्रुघ्न पाटील - मो. ८०८५६१९१००
पोसाई. दिलीप पवार - मो. ९९२२३०२८४७
पोसाई. समाधान भाटेवाल - मो. ७३७०३५७६७८
माहिती देणाऱ्यास ₹५०,००० चे रोख बक्षीस देण्यात येईल, अशी खात्री पोलिसांनी दिली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
