शिरपूर तालुक्यातील आणखी एका सरपंचाची विकेट पडली, अतिक्रमण भोवले
शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत खर्वे बु. ता.शिरपूर जि. धुळे येथील सरपंच यांना सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण भोवले असून जिल्हाधिकारी धुळे यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांना पुढील कालावधीपासून सरपंच पदावरून कमी करण्यात आले आहे.
याबाबत तक्रारदार श्याम लीलाचंद पाटील राहणार खर्दे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता त्यात त्यांनी आरोप केला होता की सरपंच चंद्रकांत ब्रिजलाल गुजर यांनी आपल्या पदाच्या गैरवापर करून शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. चौकशी आणखी हे अतिक्रमण सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी धुळे यांनी त्यांना सरपंच पदावरून आणि ग्रामपंचायत सदस्य या पदावरून अपात्र केले आहे.
तक्रारदार यांच्याकडून एडवोकेट संतोष पाटील यांनी कामकाज पाहिले.
याबाबतच्या आदेशाची प्रत संबंधित ग्रामविकास अधिकारी गटविकास अधिकारी तहसीलदार शिरपूर यांना देण्यात आले आहे.
