"शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही! भाजप नेत्याच्या अपशब्दांवर सोशल मीडियावर संतापाचा भडका"
कुजबुज - महेंद्रसिंह राजपूत
शिरपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावर एका भाजप नेत्याने वापरलेले अपशब्द आणि अवमानकारक भाष्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेच देणाऱ्या या वक्तव्याचा तालुक्यातील शेतकरी, तरुण, कार्यकर्ते आणि जनसामान्य नागरिकांनी जोरदार निषेध केला आहे.
शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून त्यांच्याविषयी अपशब्द वापरणे म्हणजे केवळ त्यांच्या नव्हे तर संपूर्ण अन्नदाता वर्गाच्या प्रतिष्ठेवर आघात होय. अशा वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून शेतकऱ्यांच्या बाजूने शेकडो लोकांनी रोष व्यक्त केला आहे. तालुक्यात साखर कारखाना विषयी जे काही आंदोलन झाले ते फक्त निषेध आणि रोष व्यक्त करण्यासाठी होते आणि शेतकऱ्यांच्या भावना प्रशासक आम्ही व्यवस्थापन यांच्यापर्यंत पोहोचाव्यात हा त्यामागे शुद्ध हेतू होता मात्र त्याला राजकारणांनी प्रेरित घेऊन आंदोलन करताना टीका करताना थेट शेतकऱ्यांच्या अवमान झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
हे ही वाचा....
वादळी वाऱ्यामुळे शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांची नुकसान
https://www.nirbhidvichar.com/2025/05/blog-post_55.html?m=1
"भाटूगिरी करणाऱ्या नेत्यांचा जाहीर निषेध", "सत्तेचा माज आणि शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही", "शेतकऱ्यांच्या औलादची ताकद दाखवून देऊ", अशा संतप्त प्रतिक्रिया विविध कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून शिरपूर तालुक्यातील जनतेने आवाज बुलंद केला आहे.
भाजपाचेच माजी शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी देखील स्पष्ट शब्दांत त्या नेत्याच्या वक्तव्याचा निषेध करत शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभं राहिल्याचे उदाहरण दिले आहे. हे आंदोलन श्रेय घेण्यासाठी नाहीतर जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी होते असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या नेत्यांचे खरे चेहरे उघडे पडले आहेत. तालुक्यात गेल्या 20 वर्षांपासून ‘एकछत्री सरंजामशाही’ सुरू असून लोकशाही फक्त नावापुरती उरली आहे, अशी भावना देखील नागरिक व्यक्त करत आहेत.
अनेकांनी यावेळी चेअरमनच्या गैरहजेरीवर देखील नाराजी व्यक्त करत म्हटलं की, “शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारायला तयार नसणारे चेअरमन, जनरल मिटींग टाळतात, सभासदांना बोलण्याची संधी देत नाहीत, ही खुली हुकूमशाही आहे.” कारखाना विषयी त्यांना काहीही माहित नाही जे काही आहे त्यांना वाचून बोलावे लागते हे देखील तालुक्याचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
या प्रकरणामुळे शिरपूर तालुक्यातील साखर कारखाना, त्याचे व्यवस्थापन, आणि नेत्यांचा दडपशाही कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. जनतेने आणि शेतकऱ्यांनी आता आवाज उठवण्यास सुरुवात केली असून हे आंदोलन केवळ प्रतिक्रियात्मक न राहता भविष्याच्या राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकेल, असे चित्र स्पष्ट होत आहे.
त्यामुळे तालुक्यात पहिल्यांदाच कोणतीही निवडणूक नसताना शिरपूर साखर कारखान्याच्या मुद्दा चर्चेत आहे हे मात्र विशेष. मात्र हे सर्व वार रंगले आहे सोशल मीडियावर. आणि सोशल मीडियावरील हे युद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही.
