शिरपूरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न – कॉ. संतोष पाटील यांची तालुका सेक्रेटरी पदी फेरनिवड

 



शिरपूरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न – कॉ. संतोष पाटील यांची तालुका सेक्रेटरी पदी फेरनिवड


शिरपूर (प्रतिनिधी) –

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शिरपूर तालुका त्रैवार्षिक अधिवेशन दि. 11 मे 2025 रोजी शिरपूर येथील काँग्रेस भवन कार्यालयात उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कम्युनिस्ट कॉम्रेड अर्जुन कोडी होते.


कार्यक्रमाची सुरुवात कॉ. साहेबराव पाटील यांच्या हस्ते पक्षध्वजारोहणाने झाली. झेंडागीतानंतर पहलगाम येथील शहीद सैनिक, तसेच दिवंगत कॉ. मदन परदेशी व किशोर सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


अधिवेशनाचे प्रास्ताविक व त्रैवार्षिक अहवाल सादरीकरण तालुका सेक्रेटरी एड. कॉ. संतोष पाटील यांनी केले. त्यांनी मागील तीन वर्षांच्या पक्षकार्याचा आढावा घेत राज्य व केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांवर टीका केली. आगामी काळात स्थानिक प्रश्नांवर लढा तीव्र करण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. शिवाय आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील पक्षाने लढवण्याच्या निर्धार केला आहे.


राज्य कार्यकारिणी सदस्य एड. कॉ. हिरालाल परदेशी यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर सडकून टीका करत कार्यकर्त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन केले.


धुळे जिल्हा सेक्रेटरी कॉ. वसंत पाटील, कॉ. नाना पाटील (एमएसईबी वर्क फेडरेशन), कॉ. पोपटराव चौधरी आदी मान्यवरांनीही आपल्या विचारप्रकट केले.


2025 ते 2028 या कार्यकाळासाठी 22 सदस्यांची तालुका कौन्सिल निवडण्यात आली. त्यामधून पुढीलप्रमाणे 11 सदस्यांची तालुका कार्यकारणी निश्चित करण्यात आली –


तालुका सेक्रेटरी: एड. कॉ. संतोष पाटील


तालुका सहसेक्रेटरी: कॉ. भरत सोनार


कॉ. नारसिंग काशीराम पावरा


सल्लागार: कॉ. अर्जुन कोडी


कोषाध्यक्ष: कॉ. बुधा मला पावरा


संघटक: गुमान गुलाब पावरा


संपर्कप्रमुख: कॉ. रामचंद्र पावरा


शहर सेक्रेटरी: कॉ. जितेंद्र लोटन देवरे


महिला सदस्य: कॉ. मालती इंदवे, सुनीता दोरीक, कथली बाई रमन पावरा



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सेक्रेटरी कॉ. वसंत पाटील यांनी केले, तर आभार कॉ. भरत सोनार यांनी मानले.

पूर्ण अधिवेशन खेळीमेळीच्या व संघटनात्मक चर्चेच्या वातावरणात पार पडले. या वेळी तालुक्यातील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने