रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीरींना तात्काळ मंजुरी द्या - बिरसा आर्मी



 रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीरींना तात्काळ मंजुरी द्या - बिरसा आर्मी


प्रतिनिधी, शिरपूर

           राज्य शासनाच्या 'मागेल त्याला विहीर' या धोरणानुसार पंचायत समितीत रोजगार हमी योजनेंतर्गत विहीरींसाठी जमा असलेल्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देवून कार्यारंभ आदेश देण्याची मागणी बिरसा आर्मी संघटनेने गट विकास अधिकारी शिरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनातून तालुका भरासाठी 1200 विहीरींची मागणी केली आहे.

           बीडीओ यांना दिलेल्या निवेदनात राज्य शासनाच्या मागेल त्याला विहीर या धोरणानुसार पंचायत समितीत रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विरीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी प्रस्ताव जमा केलेले आहेत. मात्र त्यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकरी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना तात्काळ मंजूरी देवून कार्यारंभ आदेश देण्याची मागणी करण्यात आली. तालुका भरातील शेतकऱ्यांसाठी 1200 विहीरींची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने