"युवराज माळी यांची 'सावता परिषद' धुळे जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड!"



 "युवराज माळी यांची 'सावता परिषद' धुळे जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड!"

धुळे (प्रतिनिधी) – माळी समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या सावता परिषद या राज्यस्तरीय सामाजिक संस्थेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी युवराज पंडित माळी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

ही निवड संस्थापक अध्यक्ष मा. श्री. कल्याणराव आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. गणेश दख, प्रदेश प्रमुख मा. श्री. मखुर वैद्य, मुख्य समन्वयक मा. संतोष राजगुरु, प्रमुख महासचिव डॉ. राजेंद्र कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

समाजकार्य, संघटन, आणि युवा नेतृत्वात नेत्रदीपक योगदान दिल्याबद्दल युवराज माळी यांना ही जबाबदारी बहाल करण्यात आली. त्यांच्याकडून सामाजिक न्याय, शिक्षण, युवकांचे सबलीकरण, तसेच विविध उपक्रमांतून माळी समाजाची भक्कम उभारणी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

युवराज माळी हे गेली अनेक वर्षे समाजासाठी कार्यरत असून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील माळी समाजात आनंदाचे वातावरण आहे.

या निवडीबद्दल सर्व स्तरांतून युवराज माळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने