शिरपूर crime : चार गावठी पिस्टल, सात जिवंत काडतुसेसह एकास अटक




शिरपूर  crime : चार गावठी पिस्टल, सात जिवंत काडतुसेसह एकास अटक

शिरपूर प्रतिनिधी | दि. १३ एप्रिल २०२५ – शिरपूर फाट्यावर गावठी पिस्टलची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एक इसमास ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेतून चार गावठी बनावटीची पिस्टले, सात जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन असा महत्त्वाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात एक आरोपींला अटक करण्यात आली आहे.

शिरपूर फाट्यावर एका इसमाच्या संशयास्पद हालचालींकडे पोलिसांचे लक्ष गेले. पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. हेमंत खैरनार यांनी पथकासह छापा टाकला असता, उमेदसिंग भवाणसिंग राजपूत (वय २४, रा. मोकलसर, ता. शिवाणा, जि. बालोत्रा, राजस्थान) असे इसमाचे नाव निष्पन्न झाले.

त्याच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

४ गावठी बनावटीची पिस्टल

७ जिवंत काडतुसे

३ मॅगझिन

१ मोबाईल फोन

या साहित्यासह त्याच्याकडून एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल पंचायत समक्ष हस्तगत करण्यात आला आहे. आणि त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.उप.नि. हेमंत खैरनार करत असून, ही संपूर्ण कारवाई श्री. श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, धुळे), अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत डी. बी .पथकातील पोहेकॉ राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, पोकॉ योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे यांसह अनेक अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.

या बाबत पत्रकार परिषद घेऊन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माहिती दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने