नांथे गावात संगीतमय श्रीराम यज्ञ सोहळ्याचे आयोजन
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील नांथे या गावात गाव व परिसरातील महाराणा प्रतिष्ठान यांच्यामार्फत संगीतमय श्रीराम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 6 एप्रिल पासून श्रीराम कथेला सुरुवात झाली असून दिनांक 12 एप्रिल पर्यंत दररोज रात्री आठ ते 11 या वेळेत कथा श्रवणाच्या कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नवीन मारुती मंदिराजवळ नांथे या गावात करण्यात आले आहे. या दरम्यान या ठिकाणी कथाकार म्हणून ह भ प राकेश दादा अग्निहोत्री तळवेकर यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम कथा संपन्न होत आहे. सोबत परिसरातील सुप्रसिद्ध गोरक्षक परम पूज्य संत श्री भगवानदास चैतन्य जी महाराज यांची देखील या कार्यक्रमाला सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे.
गावात मागील काही वर्षांपासून सालाबादप्रमाणे राम कथेच्या कार्यक्रम दरवर्षी संपन्न होत असतो. म्हणून गाव परिसरातील नागरिकांनी या सुवर्णसंधीच्या आणि धार्मिक प्रतिष्ठानच्या लाभ घ्यावा आणि प्रभू श्रीराम यांच्या कथा श्रावणाच्या आनंद घ्यावा असे आवाहन महाराणा प्रतिष्ठान नांथे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
