विशेष जनसुरक्षा विधेयक क्र. ३३ रद्द करा
शिरपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धरणे आंदोलन
शिरपूर (ता.प्र.) - विधानसभेत महाराष्ट्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयक क्र. ३३ विरोधात आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात या विधेयकाच्या विरोधात एकाच मागणीसाठी - "विधेयक क्र. ३३ रद्द करा" - हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि लाल बावटा शेतमजूर युनियनच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिरपूर तालुक्यातील विविध शाखांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी, भाकप शिरपूर तालुका सचिव अॅड. संतोष पाटील, अॅड. रोशन परदेशी, अॅड. एस.बी. पाटील विरदेलकर, अॅड. सचिन थोरात, अॅड. गणेश पाटील, काॅ. भरत सोनार, काॅ. वसंत पाटील, काॅ. साहेबराव पाटील, काॅ. पोपटराव चौधरी, काॅ. अर्जुन दादा कोळी, काॅ. रामचंद पावरा, काॅ. जितेंद्र देवरे, सतीलाल पावरा, तुळशीराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष जनसुरक्षा विधेयक हे लोकशाहीला धोका पोहचवणारे असून, ते रद्द करावे, अशी आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी आहे.
