थाळनेर पीक संरक्षण सोसायटी चेअरमन पदी एकनाथ जमादार व उपचेअरमन पदी राजाराम तेले यांची बिनविरोध निवड




थाळनेर पीक संरक्षण सोसायटी चेअरमन पदी एकनाथ जमादार व उपचेअरमन पदी राजाराम तेले यांची बिनविरोध निवड 

थाळनेर (प्रतिनिधी) 

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील पीक संरक्षण सोसायटीच्या चेअरमन पदी एकनाथ जमादार व उप चेअरमन पदी राजाराम तेले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तालुक्यातील थाळनेर पीक संरक्षण सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ भगवान तलवारे, थाळनेरचे लोकनियुक्त माजी सरपंच प्रशांत निकम,विकास सोसायटीचे चेअरमन रमेश तलवारे,सामाजिक कार यांचे शेतकरी परिवर्तन पॅनलने १३ पैकी १३ जागा जिंकत शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल,लोकनियुक्त सरपंच मेघा निकम,पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन किशोर पाटील यांचे शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडवला होता.
चेअरमन पदी एकनाथ जमादार व उप चेअरमन पदी राजाराम तेले यांचे एकमेव अर्ज आले होते. त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी.डी. पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी संचालक रमेशसिंग जमादार,किशोर पाटील,विक्रम पाटील,नंदलाल मराठे, अरुण शिंदे,शेखर शिंदे,अण्णा बोरसे,चंद्रकांत तेले,हेमंत चौधरी,सुरेखाबाई तुकाराम मराठे,ताराबाई भालेराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन रमेश तलवारे सामाजिक कार्यकर्ते अजितसिंग जमादार, भोजूसिंग जमादार,डोंगर कोळी,महेंद्र बाविस्कर,राकेश पाटील,राजेंद्र सावळे,बबलू मराठे, भीमसेन जमादार, छगनराव निळे,प्रदीप देवरे,भूषण तलवारे,बापू जमादार,सुनील शिरसाठ, वामन शिंदे,जावेद बागवान,डोंगर कोळी, हिलाल रायसिंग,  तुकाराम मराठे,पिंटू जमादार,गोपाल जमादार,रामू पाटील,सुरेश शेटे पत्रकार मधुकर शिरसाठ व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने