डॉ.बाबा साहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कर्मयोग्यांचा सन्मान – वाडी, मूकनायक युथ प्रतिष्ठानचा उपक्रम




डॉ.बाबा साहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कर्मयोग्यांचा सन्मान – वाडी, मूकनायक युथ प्रतिष्ठानचा उपक्रम

शिरपूर (प्रतिनिधी) –
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त वाडी बु (ता. शिरपूर) येथे मूकनायक युथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध संस्थांमध्ये कार्यरत राहून कर्तव्यदक्षतेने सेवा करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

१४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिरपूर साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून दरबारसिंग राजपूत, नामदेव चौधरी, सुवालाल चौधरी, अर्जुन पाटील, बाळू चौधरी, जितेंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील, ताहेर पटेल, दिनेश तिरमले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळा, कर्मवीर व्यंकटराव रणधीर माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्तव्यदक्षतेची दखल घेत शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील खालील १० जणांना कर्तव्यदक्ष सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला:

जि. प. शाळेचे मुख्याध्यापक पतिंगराव मोरे

कर्मवीर विद्यालयाचे उपशिक्षक चेतनकुमार पाटील

आरोग्य कर्मचारी ईश्वर सोमवंशी

आरोग्य परिचारिका योगिता मोरे

आशा गटप्रवर्तक कल्पना पवार

अंगणवाडी सेविका बेबीबाई गुजर

निवृत्त कोतवाल गुलाब भिल

विद्यार्थी वाहक नशीर शाह फकीर

पाणीपुरवठा शिपाई भवानसिंग राजपूत

अंत्यसंस्कार वाटाळ्या धुडकु कोळी


पुरस्कारासोबत दिवंगत हिरामण दगा निकुंभे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुपुत्र कृषीशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत निकुंभे यांच्या वतीने प्रत्येकी ५०० रुपयांची प्रोत्साहनपर भेट देखील देण्यात आली.

या वेळी सर्व पुरस्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त करत मूकनायक युथ प्रतिष्ठानचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अँड. ज्ञानेश्वर थोरात यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने