डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रा.आ.केंद्र रोहिणि येथे रक्तदान शिबीर संपन्न -




डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रा.आ.केंद्र रोहिणि येथे रक्तदान शिबीर संपन्न -

      संपूर्ण जगभरात महामानव डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर यांची 134 वी जयंती अतिशय थाटामाटात व उत्साहात साजरी होत असते.प्रा.आ.केंद्र रोहिणि ता.शिरपुर हे अतिदुर्गम व आदिवासीबहुल कार्यक्षेत्रातातील आरोग्य संस्था असुन मागील पाच वर्षांपासून येथे डाॅ.आंबैडकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते.
आदिवासीबहुल भाग असुनही लोक स्वयंप्रेरणेने रक्तदानासाठी येतात.
या वर्षिही मुकेशभाई पटेल ट्रस्ट रक्पेढी च्या सहकार्यातुन प्रा.आ.केंद्र रोहिणि येथे रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले.
माजी समाजकल्याण सभापती श्री कैलासभाऊ पावरा तसेच सरपंच रोहिणि  डाॅ.आनंदराव पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीराला सुरुवात झाली.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करण्यात आले.
एकुण 25 रक्तदातांनी रक्तदान केले.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असुन अशा महान व्यक्तिच्या जयंतीदिनी असे चांगले उपक्रम राबवण्यात प्रा.आ.केंद्र रोहिणि कायमच अग्रेसर रहाते असे गौरवोद्गार सभापती महोदयांनी व्यक्त केले.
प्रत्येक रक्तदातास गुलाबाचे फुल ,पिण्याच्या पाण्याची बाटली,व प्रमाणपत्र भेट देण्यात आले.
डाॅ.राष्ट्रपाल अहिरे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र रोहिणि व डाॅ.सुनिल पावरा वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारीवृंद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने