डॉ. जितेंद्र ठाकूर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार 2025’ने गौरव




डॉ. जितेंद्र ठाकूर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार 2025’ने गौरव



धुळे प्रतिनिधी –
वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही आपली अमूल्य कामगिरी बजावणारे डॉ. जितेंद्र ठाकूर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार 2025’ ने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने राज्य निसर्ग मित्र समितीच्या वतीने आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या सौजन्याने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, श्री प्रेमकुमार आहीरे, श्री डी. बी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलासराव देसले, विश्वासराव पगार, प्राचार्य आर. एन. पाटील आणि लेखक रमेश बोरसे या मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ. ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की, “या पुरस्कारामुळे माझ्यात अधिक ऊर्जा आणि प्रेरणा संचारली असून, वैद्यकीय सेवेसोबतच समाजहितासाठी अजून जोमाने काम करीन.”

पुरस्कारप्राप्तीनंतर त्यांनी राज्य निसर्ग मित्र समिती तसेच सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

वैद्यकीय क्षेत्र सोबत समाजसेवा करताना  त्यांना राजकारणाची देखील विलक्षण आवड असून ती नेहमीच राजकारणात सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी सतत तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली असून शिरपूर तालुक्यात देखील त्यांच्या मोठा राजकीय जनाधार आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना तुम्ही तालुक्यातील नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सेवा पुरवत असतात. विविध शिबिर आणि सामाजिक उपक्रमातून आपली आरोग्य सेवा ते लोकांना देत असतात. 

त्यामुळे त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे वैद्यकीय, राजकीय व सामाजिक क्षेत्रात देखील आनंद व्यक्त केला जात असून त्यांची सर्वत्र अभिनंदन केले जाता आहे.












Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने