*आढे येथे महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा*
शिरपूर तालुक्यातील नवीन आढे येथील पशुपतीनाथ महादेव मंदिरात महाकुंभ तीर्थदर्शन सोहळ्याचे अनुगामी लोकराज्य महाभियान व क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्था,आढे यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रयागराजमध्ये १४४ वर्षानंतर संपन्न होत असलेल्या महाकुंभ मेळाव्यात त्रिवेणी संगमातील गंगा,सरस्वती,यमुना या नदींचे जलाचे पूजन जोशी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील अनेक जोडप्यांचा साक्षीने पूजन करण्यात आले.यावेळी पोलीस पाटील राजकिरण राजपूत,कृ.उ.बा.समिती शिरपूरचे संचालक शांतीलाल जमादार,माजी उपसरपंच सुनील पवार,माजी सरपंच निंबा राजपूत,शिवराणा संस्थेचे संचालक अजितसिंग राजपूत,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी अनुलोम संस्थेचे प्रतिनिधी मनोज राजपूत,सुमित सिसोदिया क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
