अन्यथा वाहनाचा ललाव करणार- थाळनेर पोलीस स्टेशनचे आवाहन
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारात विविध गुन्ह्मांच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेली एकुण २९ बेवारस स्थितीतील तसेच चोरीस गेलेल्या व अपघाती २५ दुचाकी व ४ चारचाकी वाहने बऱ्याच कालावधीपासून
थाळनेर पोलीस ठाण्यात पडून आहेत, ही वाहने गंजून खराब झाल्याने पोलिस ठाण्याच्या आवारात अस्वच्छता पसरली आहे, या बेवारस आणि बिनधनी
वाहनांनी जागा व्यापल्याने नव्याने दाखल गुन्हातील वाहने लावण्यास अडचण निर्माण होत आहे.
तरी, ही वाहने ज्या कुणाच्या मालकीची असतील
त्यांनी वाहनाबाबत खात्री करून. स्वतःसह वाहनाची ओळख पटून, मुळ कागदपत्रे आणून.खात्री पटवून.कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून
आपली वाहने पुदील १५ दिवसांत म्हणजे ३ एप्रिल
२०२५ पर्यत आपल्या ताब्यात घ्यावीत. विहित कालावधीमध्ये वाहने घेऊन न गेल्यास त्या वाहनांचा शासकीय पद्धतीने लिलाव करण्यात येणार आहे,
त्यानंतर कोणाचीही तक्रार घेतली जाणार नसल्याचे
आवाहन थाळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस
निरीक्षक क्षत्रुन पाटील यांनी केलेआहे.
