*श्री.शिवजन्मोत्सवा निमीत्त १९ फ्रेंबुवारी रोजी भव्य व खुली किल्ले बनविणे स्पर्धा व प्रदर्शनाचे शिरपुरात आयोजन*

 



*श्री.शिवजन्मोत्सवा निमीत्त १९ फ्रेंबुवारी रोजी भव्य व खुली किल्ले बनविणे स्पर्धा व प्रदर्शनाचे शिरपुरात आयोजन*


छत्रपती शिवाजीराजांच्या गड किल्ल्यांचे बीज छोट्या छोट्या मित्रांमध्ये, बाल मनातच रुजावे यासाठी भव्य किल्ले महोत्सव व प्रदर्शन स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंती चे औचित्य साधून मागील वर्षाचा उत्कृष्ठ प्रतिसादा नतंर सलग सातव्या वर्षी शिरपूर येथील *श्री.आयोध्या धाम(गरबा मैदान)* येथे दिनांक १९-२ -२०२५ बुधवार रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आली असून किल्ले प्रदर्शन रात्री आठ वाजेपर्यंत ठेवण्यात येईल तरी जास्तीत जास्त पालकांनी व विद्यार्थ्यांनी याच्या लाभ घ्यावा या सर्व किल्ल्यांची माहिती देण्यात येईल. स्पर्धेचे आयोजन संपूर्ण शिरपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले आहे .  आजच्या लहान पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास जवळून अनुभवता यावा या करिता आपण वरिष्ठ व तरुणांनी आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील थोड्यातरी किल्ल्यांची सफर घडवली पाहिजे.याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या भव्य किल्ले महोत्सव स्पर्धेद्वारे महाराष्ट्रातील किल्ल्याबद्दल लहान मुलांमध्ये आवड व ओढ निर्माण व्हावी तसेच मोबाईल,टीव्ही गेम मध्ये रमलेल्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा तरुणांमध्ये असलेले किल्ले संवर्धनाबद्दलच्या जानीव योग्य दिशा लाभावी म्हणून हा प्रयत्न आहे.तरी शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा अशी  विनंती श्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा समितीमार्फत व श्री. रोहीत त्र्यंबक शेटे (मा.शहर सरचिटणीस भा ज पा)  यांच्या तर्फे करण्यात आलेली आहे * सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व श्री छत्रपती शिवाजी महारांजाची प्रतिमा देण्यात येईल. तसेच लहान गट, मोठा गट, खुला गट असे प्रत्येकी प्रथम दुतीय व तृतीय बक्षीस देण्यात येईल यात प्रत्येकी प्रथम बक्षीस ३१००/- दुतीय बक्षीस २१००/-  व तृतीय बक्षीस ११००/-समिती मार्फत घेण्यात येणार आहे. *कार्यक्रमाचे आयोजन श्री. रोहीत त्र्यंबक शेटे (शहरसरचिटणीस भा.ज.पा) श्री. हेमंत कृष्णा शेटे (सर) श्री. जिंतेद्र विजय शेटे (विजय बुक स्टाॅल यांनी केले आहे.*


*अधिक माहितीसाठी  70 28 391001 / 98 22 73 63 74/9850524682 या नंबर वर संपर्क साधावा असे समिती मार्फत आव्हान  करण्यात आले आहे.*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने