ज्येष्ठ पत्रकार रणवीरसिंह राजपूत यांना उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार बहाल*.




 *ज्येष्ठ पत्रकार रणवीरसिंह राजपूत यांना उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार बहाल*.


ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर नववर्षनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व मंत्रालयातील निवृत्त प्रसिद्धी अधिकारी,खान्देशपुत्र श्री.रणवीरसिंह बाबुसिंह राजपूत यांना पत्रकारिता क्षेत्रातील ४५ वर्षांच्या भरीव योगदानाबद्दल *जीवन गौरव पुरस्कार* बहाल करून गौरविण्यात आले.मंत्रालयात कार्यरत असतेवेळी त्यांना *गुणवंत अधिकारी पुरस्कार* देऊन माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित माहिती अधिकाऱ्यांच्या परिषदेत बहाल करण्यात आला होता.त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांनी पत्रकारिता सुरूच ठेवली.आज त्यांना रिटायर्ड होऊन १६ वर्षे लोटली,तरीही  त्यांनी लोकशिक्षण व 

जनजागृती करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता अव्याहतपणे सुरू ठेवली आहे.

कल्याण येथे वास्तव्याला असताना त्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेकडून *उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार* तर ठाणे महापालिकातर्फे कोरोना जनजागृती करण्यासंदर्भात  *ठाणे गौरव पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले.याशिवाय माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते *कोविड योद्धा सन्मान पुरस्कार* देण्यात आला. 


पत्रकार रणवीर राजपूत यांना *जीवन गौरव पुरस्कार* देताना ठाण्याचे खासदार श्री.नरेश म्हस्के मा.आमदार श्री.रविंद्र फाटक, माजी महापौर सौ.मीनाक्षीताई शिंदे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख श्री.मंगेश चिवटे,मदत कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत,सहप्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

..................................................

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने