शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शांतता बैठक
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशन व शिरपूर प्रशासन यांच्यामार्फत आगामी काळात येणारे सण उत्सव व 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणारी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि त्या जयंती निमित्ताने होणारे विविध कार्यक्रम याबाबत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी आयोजकांना व कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के पाटील यांनी केले. त्यात त्यांनी काही मार्गदर्शक सूचना व प्रस्ताव समोर ठेवले. त्यात प्रामुख्याने मोटर सायकल रॅलीमध्ये कोणतेही मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन होणार नाही, तसेच कोणीही ट्रिपल सीट मोटरसायकल चालवणार नाही, झेंड्यांची उंची निर्धारित असावी, शक्यतोवर पारंपारिक वाद्यांच्या उपयोग करावा, आणि एक ड्रेस कोड चा वापर करावा इत्यादी सूचना व प्रस्ताव समोर ठेवले.
यानंतर आयोजकांकडून देखील प्रशासनाकडून काही बाबींची पूर्तता करण्यासाठी मागणी करण्यात आली.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील सर्वच मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. आणि आगामी काळातील सण आणि उत्सव शहरात शांततेत आणि आनंदात साजरा करणे विषयी प्रशासन आणि आयोजक यांच्यात समन्वयक चर्चा झाली.
यावेळी प्रत्येकाने शिरपूर शहरात अबाधित असलेली शांततेची परंपरा कायम असून शहरातील नागरिक आणि प्रशासन याच्यातील सुसंवाद असल्याने या शहरातील सर्वच कार्यक्रम आजपर्यंत शांततेने पार पडले आहेत आणखी एक शहराची ओळख आहे.
यावेळी आयोजकांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांविषयी माहिती देऊन या कार्यक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक के के पाटील, नगरपरिषदेचे सीईओ सर्वोदय, एम एस ई बी चे अभियंता डी एम पाटील, नायब तहसीलदार पेंढारकर, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार आणि पाटील साहेब इत्यादी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रशासनिक अधिकारी म्हणून उपस्थित उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, डीवायएसपी सुनील गोसावी, सीईओ सरोदे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित नागरिकांमधून रज्जाक कुरेशी, राजू सोनवणे इरफान मिर्झा हेमंत पाटील, रत्नदीप सिसोदिया, संजय पाटील, यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी केले.
