वनपट्टेधारकांसाठी बिरसा आर्मीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी, शिरपूर
सातबारा धारक शेतकऱ्यांसाठी एग्रीस्टॅगच्या माध्यमातून फार्मर आयडी मिळत आहे. मात्र तालुक्यातील वनपट्टे धारक शेतकऱ्यांची शासन दरबारी कसलिही नोंद नसल्याने त्यांची नोंद होवून सरकारी लाभ, नुकसान भरपाई मिळण्याची मागणी बिरसा आर्मी संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात तालुक्यात मोठ्या संख्येने वनपट्टे धारक शेतकरी आहेत. त्यांना शेती विषयक सरकारी योजनांचा लाभ, नुकसान भरपाई, पीककर्ज मिळणे यासोबतच नवीन रेशनकार्ड बनवणे, धान्य नियमित मिळणे याबाबत तहसीलदारांशी चर्चा केली. दरम्यान गरीब नागरिक मजूरी करून धान्य विकत घेतात, धान्य नियमित मिळाले तर मजुरीचे पैसे शिक्षण आणि आरोग्यावर खर्च होणार असल्याचा मुद्दा तहसीलदरांच्या लक्षात आणून दिला. दोन महिन्यांपासून रेशनकार्डचे संकेतस्थळ बंद असल्याच्या समस्येवरही चर्चा झाली. यावेळी राज्याध्यक्ष मनोज पावरा, लकी पावरा, मिस्तर पावरा, शिवाजी पावरा, ईश्वर मोरे, समाधान ठाकरे, सुनिल पावरा, चरण पावरा, सलीम पावरा, दारासिंग पावरा आदी उपस्थित होते.
