महाशिवरात्री निमित्ताने तिर्थक्षेत्र सावळदे येथे उद्यापासून दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन!*



*महाशिवरात्री निमित्ताने तिर्थक्षेत्र सावळदे येथे उद्यापासून दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन!*

शिरपुर (प्रतिनिधी): दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सावळदे ता. शिरपुर येथील तापी काठावरील पुरातन क वर्ग दर्जा प्राप्त असलेले तिर्थक्षेत्र महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने दि.२५ व २६ फेब्रुवारी असे दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्सव समिती आणि सावळदे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांचा परिसरातील भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन महाशिवरात्री उत्सव समितीचे अध्यक्ष तथा सावळदे गावाचे उपसरपंच सचिन राजपूत यांनी केले आहे.

यावेळी दि.२५ रोजी वीर एकलव्य जयंती निमित्ताने सुरत (गुजरात) येथील रॉकी स्टार बँडच्या तालावर दुपारी १२ ते ६ वाजेपर्यंत "विर एकलव्य स्मारक चौक ते महादेव मंदिर तापी काठ सावळदे पर्यंत भव्य मिरवणुक काढण्यात येईल. तर रात्री ८ वाजता महादेव मंदिर पटांगण तापी काठ सावळदे येथे विनोद सम्राट ह.भ.प रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांच्या मधुरवाणीतुन‌ जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच दि.२६ रोजी सकाळी ६ वाजता महाशिवरात्री निमित्ताने शिवलिंगाचे विधीवत पूजन व दुग्धाभिषेक करण्यात येईल. सकाळी १० वाजता उपवासानिमित्ताने भाविकांना फराळ वाटप तर सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. प्रतिभाताई सोनगिरकर यांच्या मधुर वाणीतून जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर रात्री ८ वाजता भाविकांना फराळ वाटप करण्यात येईल. तरी तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील शिवभक्तांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून शिव उत्सव पर्वाचा आनंद घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ सावळदेयां नी केले आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने