शीर्षक नाही




 *वर्ल्ड सोसायटी फॉर पीस, दक्षिण कोरिया कडून एस पी डी एम महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ.एल.के प्रताळे यांना शांतता आणि स्पोर्ट्स पुरस्कार 2025 प्रदान.*


 किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एस पी डी एम महाविद्यालयाचे क्रीडा संचालक यांना वर्ल्ड सोसायटी फॉर पीस, दक्षिण कोरिया कडून दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदान करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा 'शांतता आणि स्पोर्ट्स पुरस्कार 2025' नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी दिला जातो, जो एखाद्या व्यक्तीच्या कार्याची सखोल तपासणी करून दिला जातो.प्रा. डॉ. लिंबाजी काशीराम प्रताळे हे क्रीडा क्षेत्रात एक अत्यंत मान्यताप्राप्त व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि संशोधन यामुळे त्यांना या पुरस्कारासाठी निवडले गेले आहे. त्यांचा क्रीडा संशोधन, मार्गदर्शन, आणि विविध क्रीडा पद्धतींचा अभ्यास करण्यामध्ये महत्वाचा सहभाग आहे. त्यांचे कार्य क्रीडा विकास, त्यातील तंत्रज्ञान, आणि खेळाडूंच्या मानसिक विकासासंबंधी अत्यंत मोलाचे आहे. प्रा. डॉ. प्रताळे यांचा कार्यक्षेत्र विविध क्रीडा शास्त्र, प्रबंधन, खेळाच्या तंत्रज्ञानातील नवकल्पनांपासून ते खेळाडूंच्या प्रशिक्षण, शारीरिक व मानसिक विकास यावर आधारित आहे. त्यांनी क्रीडा आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रात अनेक तालुका,जिल्हा,राज्यस्तर आणि विद्यापीठ स्तरीय क्रीडा संघटनांमध्ये त्यांचा सल्ला व मार्गदर्शन नेहमीच मोलाचा ठरला आहे.वर्ल्ड सोसायटी फॉर पीसच्या या पुरस्कारासाठी सदर व्यक्तिमत्वाची निवड करतांना त्यांच्या क्षेत्रातील योगदान, कार्यशैली, तसेच क्रीडा क्षेत्रातील शांतता व सहयोग वाढविण्याचे कार्य यावर आधार घेतला जातो. प्रा. डॉ. प्रताळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांचे कार्य प्रेरणादायक ठरले आहे.

हैदराबादमध्ये झालेल्या या भव्य समारंभात दक्षिण कोरिया येथील वर्ल्ड सोसायटी फॉर पीसचे अध्यक्ष प्रो.डॉ ली.जोंग युंग, तेलंगणा राज्याचे सांस्कृतिक व पर्यटन मंत्री नामदार श्री जूपल्ली कृष्णराव यांनी  प्रा. डॉ. प्रताळे यांच्या कार्याचे गौरवोद्गार काढले.

 सदर पुरस्काराबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार भाऊ रंधे, सचिव श्री निशांत जी रंधे, खजिनदार श्रीमती आशाताई रंधे,विश्वस्त श्री रोहित रंधे,प्राचार्य डॉ. एस.एस राजपूत उपप्राचार्य डॉ. दिनेश भक्कड,डॉ.आबासाहेब देशमुख कार्यालयीन अधीक्षक डॉ. चारुशीला ठाकूर आदींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने