*सामाजिक बांधिलकी जपत तौसिफ बेग यांच्यातर्फे शवपेटी भेट.*
*बेग यांच्यावर उलटली कौतुकाची लाट*
*सातपुडा वार्ता प्रतिनिधी शिरपूर*
शिरपूर : मानवी जीवनात मृत्यू हे एक अटळ सत्य आहे.मृत्यूनंतरही मानवाचा देह अंत्यविधीपर्यंत चांगला ठेवण्याचे प्रयत्न कुटुंबीयांकडून होत असतात. काही वेळा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह रात्रभर किंवा ६ ते ७ तास घरात ठेवावा लागतो या कालखंडात मृतदेह व्यवस्थित राहावा यासाठी शहरातील गुलाम ए मुस्तफा फाउंडेशन चे सहसचिव तौसीफ बेग हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून सामाजिक बांधिलकी जपत,मानवाच्या अखेरच्या सेवेसाठी शवपेटी भेट दिली आहे.
तौसिफ बेग यांनी आपल्या मित्रांसोबत चर्चेतून मृतांसाठी एक शवपेटी विकत घेण्याचे ठरले. हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला.व स्वखर्चाने एक शवपेटी खरेदी करून औपचारिक सेवेत दाखल करण्यात आली आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला व मृतदेह रात्रभर ठेवण्याची वेळ येईल तेव्हा त्या कुटुंबाच्या मागणीनुसार ही शवपेटी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तौसिफ बेग यांनी म्हटले व तसेच बेग यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
