तालुक्यातील ग्रामीण भागातील पाड्यांवरील जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा
शिरपूर तालुक्यात शासनाकडून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या कामांच्या उडाला असून अनेक कामे ही अपूर्ण स्थितीत आहेत. यात प्रामुख्याने मौजे फत्तेपूर फॉरेस्ट तालुका शिरपूर या गावात व ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाड्यांवर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या कामंची चौकशी करावी अशी मागणी नारायण बोंडा पावरा माजी सरपंच फत्तेपुर तालुका शिरपूर यांनी केले आहे.
यात त्यांनी मागणी केली आहे की आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत रूपसिंग पाडा, ठाणसिंग पाडा, इग्न्यापाडा, कुंभी पाडा ,मांजरी पाडा, भगवान पाडा, सकऱ्या पाडा ,रोलसिंग पाडा ,चंद्या पाडा, चोंबल्या पाडा असे एकूण 11 ते 12 पाढे गावाला जोडून आहेत .
प्रत्येक गावातून प्रत्येक पाड्यावर विहीर ,पाईपलाईन, पाण्याची टाकी, स्विच रूम असे कामे मंजूर आहेत.
जलजीवन मिशन ही योजना सन 2022-23 पासून या गावांसाठी मंजूर असून जवळपास तीन वर्षांपासून अद्याप पर्यंत या पाड्यातील कोणतेही काम पूर्ण झालेले नाही व पिण्याच्या पाण्याची सोय देखील झाली नाही. त्यामुळे या परिसरात श्रमगाता कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या कामांची चौकशी करावी, आणि चौकशी अंतिदोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि याबाबतची चौकशी करून आमच्या पाण्याच्या प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका चे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
