दोंडाईचा येथे किराणा **दुकानाचे शटर उचकावुन दुकानात चोरी; दोघांना पोलिसांनी केले जेरबंद** दोडाईचा (मुस्तफा शाह)

 



दोंडाईचा येथे किराणा **दुकानाचे शटर उचकावुन दुकानात चोरी; दोघांना पोलिसांनी केले जेरबंद**


दोडाईचा (मुस्तफा शाह)

दोंडाईचा पोलीसांची दमदार कामगिरी

 दोंडाईचा, येथे दिनांक १४ २ रोजी

सादीक रुबाब खाटीक वय ४२ धदा किराणा दुकान गोसीया नगर दोडाईचा यांनी दिलेल्या फिर्यादमध्ये त्यांचे गौसीया नगर येथील किराणा दुकानाचे कुलप व पटटया कापुन शटर उचकावुन दुकानाचे गल्यातील रोख रक्कम ६५,०००/- रुपये चौरटयानी चौरी करून पळून गेले होते. अशी फिर्याद दिनांक १४/०१/२०२५ रोजी दौडाईचा पोलीस स्टेशन येथे भाग ०५ गुरनं ०८/२०२५ भा.न्या. सं. कायदा २०२३ चे कलम ३०५ (अ) ३३१ (४) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्हयातील संदर्भात मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक धुळे, श्री, किशोर काळे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे श्री सुनिल गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग, शिरपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस

निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या  माहीती वरून त्यांनी गुन्हयाचा तपास जलदगतीने फिरवून त्यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे पौसई ३) कुमावत, पोहेको ९८८ रविंद गिरासे, पोना। रा. १२२३ राजेंद  पोकों/४५६ हिरालाल सुर्यवंशी, पोकों / १६३८ महेश शिंदे, पोकॉ। १७१४ प्रविण निकुंबे, पोकों/१००३ गवळी अशानी गुन्हयातील आरोपी १) तौसीफ एजाज मन्यार वय २५ रा गौसीया नगर दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे २) साहील वाजिद पठाण वय २१ रा गौसीया नगर, दोंडाईचा  ता. शिंदखेडा जि.धुळे, ३) नुर नीसार पीजारी, ४) अरबाज मेहमुद पिंजारी अशा गुन्हयातील फियार्थी यांच्या कीराणा दुकानात प्रवेश करुन कीराणा दुकानाचे कुलप व पटटया कापुन शटर उचकावुन दुकानाचे गत्यातील रोख रक्कम ६५,०००/- रुपये दुकानाचे गल्यातील रोख रक्कम चोरी केल्याचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने सदर


आरोपी यांचा शोध घेत असतांना आरोपी १) तौसीफ * एजाज मन्यार वय २५ नरा गौसीया नगर, दोंडाईचा  ता. शिंदखेडा जि. धुळे २) साहील वाजीद पठाण वय २१ रा गौसीया नगर, दोडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे हे मौनाली होटेल चौफुली परिसरात असल्याचे माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेत असतांना ते मोनाली होटेल धुळे  चौफुली जवळील एक टपरी जवळ मिळून आल्याने त्यांना गुन्हयाकामी ताब्यात घेतले आहे त्यांना विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल करुन गुन्हयातील चौरीस गेलेले ६५,००० रुपये पैकी ३०,०००/- रुपये त्यांचे कडून हस्तगत। केले आहेत. सदर गुन्हयातील फरार आरोपी नूर नौसार पिंजारी, ४) अरबाज मेहमुद पिंजारी दोडाईचा हे फरार असून त्यांचा शोध घेत आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने