शिरपूर यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन
शिरपूर प्रतिनिधी
दिनांक 12 फेब्रुवारी पासून शिरपूर शहराची खंडेराव बाबा यांची यात्रा सुरू झाली आहे. यात्रेनिमित्ताने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली असून यानिमित्ताने बाजार समिती परिसरात घोडेबाजार देखील सजला आहे. याव्यतिरिक्त इतर व्यापारी देखील यात्रेनिमित्ताने बाजार समिती आवारात दाखल झाले आहे. दिनांक 12 रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीती यात्रा उत्सवाच्या उद्घाटन समारंभ पार पडला.
या निमित्ताने बाजार समिती आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या आर्थिक व शाश्वत परिवर्तनासाठी दिनांक 15 फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता शेतकरी आर्थिक विकास व आधुनिक शेती व्यवस्थापन मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटक माननीय नामदार अमरीश भाई पटेल माझी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार काशीराम दादा पावरा व माननीय भूपेश भाई पटेल चेअरमन प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
या कार्यशाळे अंतर्गत माती परीक्षण व काळाची गरज, बदलत्या हवामानानुसार केळी व पपई पिकावरील प्रमुख आव्हाने व त्यावरील उपाय योजना, उन्हाळी तीळ व मुग लागवड व्यवस्थापन आणि मार्गदर्शन, कृषी विभागाच्या महत्त्वपूर्ण विविध योजना इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
तरी कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर आवारातील शेतकरी भुसाळ शेड, मार्केट यार्ड शिरपूर येथील या आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय पवार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील सर , यात्रा उपसमितीचे सभापती मिलिंद पाटीलआणि सर्व संचालक मंडळ शिरपूर यांच्याकडून करण्यात आले आहे.
