राजपूत समाज बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर
शहरातील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेचे आयोजन
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था स्थापन करण्यात आले असून या संस्थेमार्फत सध्या विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जात आहे. यापूर्वी नुकताच काही दिवसांपूर्वी संस्कार शिबिर संपन्न झाले होते. आता संस्थेने पुन्हा शिरपूर तालुक्यातील राजपूत समाज बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात मोतीबिंदू व डोळे संबंधित सर्व आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे. सदर कार्यक्रमासाठी श्री रविंद्रसिंग भटेसिंग राजपूत
(रविशेठ साईधारा ग्रुप सुरत) अध्यक्ष - राधाकृष्ण प्रेम मंदिर बांधकाम समिती तामथरे शिंदखेडा यांचे सौजन्य लाभले आहे. या शिबिरासाठी वैद्यकीय सेवा समर्थ नेत्रालय शिरपूर डॉक्टर दीपक जाधव आणि डॉक्टर शितल जाधव यांची सेवा लाभणार आहे शिवाय शंकर आय हॉस्पिटल आनंद गुजरात यांची देखील सहकार्य लाभणार आहे.
दिनांक : 06/02/2025 गुरुवार सकाळी 09:00 ते दु 1 वाजेपर्यत हे शिबिर संपन्न होणार आहे.
शिरपूर शहरातील स्व इंद्रसिंग भाऊसाहेब मेमोरिअल हॉल, 'राजपूत भवन, वरझडी रोड, शिरपूर. या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी शिरपूर तालुक्यातील राजपूत समाज बंधू भगिणींनी मोठ्या संख्येने या शिबिराच्या लाभ घ्यावा असे आवाहन महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था शिरपूर यांनी केले आहे.
