शिरपूर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे दुरुस्तीकरण व्हावे व शिरपूर टोल स्थानिकांना माफ व्हावा यासाठी शिरपूर फर्स्टचे खासदारांना पुन्हा निवेदन.!
गुजरात अंकलेश्वर पासून तर मध्यप्रदेश बुऱ्हाणपूर पर्यंत महाराष्ट्राच्या धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग. गेल्या अनेक वर्षांपासून याची परिस्थिती बिकट आहे, २०१९ मध्ये ह्या महामार्गाला 'राष्ट्रीय महामार्गचा' दर्जा देण्यात आला. नुकताच काही महिन्यांपूर्वी NH753B म्हणून ओळखला जाणार अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्ग चौपदरीकरण होणार आहे असा आदेश सरकारने दिला आहे.
गेल्या वर्षी देखील शिरपूर फर्स्ट ने या मागणीसाठी आंदोलन केले होते, त्यानंतर दहिवद ते तोंदे या महामार्गाचे दुरुस्तीकरण देखील झाले. पण शिरपूर शहरातून जाणारा हा महामार्ग शहराच्या हद्दीत याची अवस्था बिकट झालेली आहे, शहराच्या प्रमुख ठिकाणी या महामार्गावर जीव घेणे खड्डे आहेत. अनेक वेळा तक्रारी देऊन देखील शहरातील महामार्गाचे दुरुस्ती करणे होत नाही. तरी आता नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी यांनी या विषयात लक्ष घालून या महामार्गाचे दुरुस्तीकरण लवकरात लवकर केले पाहिजे असे निवेदन शिरपूर फर्स्ट ने दिले आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून शिरपूर फर्स्ट अनधिकृत टोल वसुली विरोधात सातत्याने आंदोलन करत आहे. अनेक नियमांना फाट्यावर मारून शिरपूर टोल चालवला जात आहे. शिरपूर टोल हा शिरपूर नगरपालिका हद्दीपासून केवळ तीन किलोमीटरवर आहे. तरी शिरपूर टोलवर स्थानिकांना टोल माफी व्हावी यासाठी शिरपूर फर्स्ट आंदोलन करत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आमदारांना खासदारांना अनेक वेळा निवेदन देऊनही यावर तोडगा निघत नाही. तरी आता किमान शिरपूर टोल हा स्थानिकांना तरी माफ झाला पाहिजे जेणेकरून स्थानिक जनतेवर अन्याय होणार नाही, असे निवेदन शिरपूर फर्स्ट च्या वतीने देण्यात आले आहे.
नंदुरबार लोकसभा खासदार एड. गोवाल पाडवी शिरपूर दौऱ्यावर आले असता, शिरपूर फर्स्ट च्या वतीने त्यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी शिरपूर फर्स्ट चे समन्वयक हंसराज चौधरी व कुणाल भदाणे उपस्थित होते.
