शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे शिवबा डायलिसिस सेंटर चे उद्घाटन दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना डॉक्टर तुषार रंधे यांनी प्रतिपादन केले की शैक्षणिक संस्थांना समाजातील दातृत्ववान व्यक्तींच्या मदतीने खूप उपयोग होतो. बोराडी आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्व .शिवाजीराव पाटील यांच्या स्मृतिपित्यर्थ डायलिसिस मशीन दिले ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे त्यामुळे गरीब आदिवासी रुग्णांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.
बोराडी येथील श्री सतीमाता पतसंस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय शिवाजी भटा पाटील यांच्या स्मृति प्रित्यर्थ श्रीमती आशा शिवाजी पाटील यांनी बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद महाविद्यालय संलग्न लीलाई हॉस्पिटल ला डायलिसिस मशीन सप्रेम भेट दिले तसेच डॉक्टर तुषार रंधे आशाताई रंधे यांच्या संकल्पनेतून या डायलेसिस दालनास शिवबा डायलिसिस सेंटर कैलासवासी आबासो शिवाजीराव भटा पाटील यांच्या स्मृती पित्यर्थ नामकरण करण्यात आले .हा उद्घाटन सोहळा व नामकरण सोहळा बोराडी येथील आयुर्वेद महाविद्यालयातील हॉस्पिटलमध्ये संपन्न झाला यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे येथील एस एस व्ही पी एस संस्थेची उपाध्यक्ष डॉक्टर एस.टी. पाटील, साहेबराव पितांबर पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य रणजीत पावरा ,किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे ,विश्वस्त रोहित रंधे, सरपंच सुखदेव भिल, विनायक देवरे ,डॉक्टर भास्कर पाटील विश्वासराव गुलाबराव पवार, नानासाहेब सूर्यवंशी रघुनंदन, भगवंत अहिरराव सतीश संतोष पाटील, दगडू चुडामण पाटील ,अजित साहेबराव शिंदे ,ज्ञानेश्वर राजधर पाटील ,सीमाताई रंधे सारिका रंधे,हर्षाली रंधे, रोहिणी रंधे संस्थेचे विश्वस्त शामकांत शिवाजीराव पाटील, धुळे नंदुरबार ग.स. बँकेचे संचालक शशांक रंधे, प्राचार्य डॉक्टर राजेश गिरी, डॉक्टर दिलीप पाटील, तुषार शिवाजीराव पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते याप्रसंगी राहुल रंधे, हिराबाई मल्हारराव पाटील यांनी बोराडी सारख्या ग्रामीण भागात डायलिसिसची सेवा उपलब्ध झाल्याने रुग्णांच्या वेळ व पैसा वाचणार आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयुर्वेद महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन पाटील यांनी केले.
