शिरपूर शहर आणि परिसरातील अवैध व्यवसाय बंद होण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेचे निवेदन




शिरपूर शहर आणि परिसरातील अवैध व्यवसाय बंद होण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेचे निवेदन 

शिरपूर शहर आणि परिसरात अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे यासाठी दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील हिंदू राष्ट्र सेने ने उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना निवेदन दिले आहे. 

यात नमूद करण्यात आले आहे की सद्यस्थितीत शिरपूर शहरात वेगवेगळे अवैध व्यवसायांच्या सूचना झाला असून त्याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. या सर्वांवर पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे गावगुंड आणि अवैध व्यवसायांना चालना मिळाली असून त्यातून सर्वसामान्यांना मोठा उपद्रव सहन करावा लागत आहे. 

शहरात अवैध मध्य विक्री सर्रास सुरू आहे, पान टपऱ्या खाद्यपदार्थांच्या लॉऱ्या लहान-मोठी हॉटेल येथे सहजपणे अवैध दारू उपलब्ध असते त्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाले असून बनावट दारूच्या व्यसनामुळे अनेक तरुण अकाली मृत्युमुखी पडत आहेत. 

यासोबत शहरात नकली ताडी विकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे शहरात भेसळयुक्त आणि केमिकल युक्त ताडी विकली जात असल्याने त्याच्या देखील परिणाम आरोग्यावर होत आहे. तालुक्यात ताडीचे उत्पादन नसताना दररोज हजारो लिटर ताडी कशी तयार होते याच्या देखील शोध घेण्याची गरज आहे. 

शहरालगत जाणाऱ्या महामार्गावरून सर्रासपणे गुरांची तस्करी होते. यात झाल्याने हिंदू समाजाच्या भावना दूखावत आहेत. मात्र या सर्वांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. 

याशिवाय शहरात सट्टा मटका, अवैध सावकारी, अव्वचा सव्वा व्याज आकारणारी टोळी तयार झाली असून त्यांना कोणत्याही कायद्याच्या धाक राहिलेला नाही. 

शिवा शहरात पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या कॅफेवरील कारवाई देखील ठोस कारवाई झाली नसून दोषींना अभय दिले जात आहे. 

शहरात सुरू असणारे वरील प्रमाणे निदर्शनास आणून देण्यात येणारे सर्व अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून याकडे पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळे या निवेदनाची दखल घेण्यात येऊन हे सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यास 26 जानेवारी 2025 रोजी विविध संघटनांचे अधिकारी हे उपोषणास बसतील असा इशारा देखील प्रशासनास देण्यात आला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने